Monday, December 25, 2017

GENERICO. A GENERIC DRUG STORE TO SELL EQUIVALENTS OF POPULAR AND COSTLY MEDICINES INAUGURATED IN BHANDUP.

Young IIT Bombay entrepreneurs launch a social enterprise and initiate a movement to educate people about affordable generic medicines.


 GENERICO” Bhandup shop was inaugurated by MLA Ashok Patil, Girish Agarwal, Siddharth Gadiya and all workers were present on this occasion
‘जेनेरीको’ भांडूप औषधलयाचे उद्घाटन आमदार श्री अशोक पाटील यांचा हस्ते करण्यात आले. त्यांचा बरोबर ‘जेनेरीको’ चे विश्वस्त श्री गिरीश अगरवाल, सिद्धार्थ गादिया व सर्व सहकारी उपस्थित होते.



On 25th DEC 2017, 11:00 am Generico, a generic medicine store located at Bhandup West, opp BMC School, Tank Road was inaugurated at hands of Bhandup MLA Shree Ashok Patil. Girish Agarwal, one of the partners of Genrico explained the large gathering about the generic drugs movement in India. MLA Shree Ashok Patil congratulated Agarwal for his initiative of making affordable generic drugs available for the people of Bhandup.

PRESENT STATE OF HEALTHCARE IN INDIA
Approximately 4 crore Indians are pushed into the darkness of poverty every year because of the unaffordable healthcare solutions. Moreover many others prefer death to the expensive health care. Costly medications further add to the trauma of the patients while the gap between the manufacturing cost and the MRP range anything between 500 to 1000 percent. This has resulted in even the basic public health services to be out of reach of commoners.

GENERIC ALTERNATIVE TO COSTLY MEDICINAL DRUGS
The same of top medicine manufacturing companies produce the same medicines with same components, having the same effectiveness, under another brand which is distributed directly to trade and are called 'Generic' drugs. These products exclude the regular promotional costs incurred (100 to 500 percent) on marketing the products to doctors, hence reducing their cost to bare minimum and thus making the same medicinal affordable.

GOVERNMENT INTERVENTION TO PROMOTE GENERIC DRUGS
The Indian government is also working hard towards making generic medicines available through its Jan Aushadhi Stores at 80% less than the MRP. Even at this sale price, the products can carry a gross margin of 20-25% at retail level. If the medicines are sold at their true price, patients suffering from lifestyle diseases like diabetes, hypertension, etc. can save as much as Rs. 20,000 - 25,000 per annum.

GENERICO INITITIAVE TO CREATE A MOVEMENT FOR GENERICS

Generico is a social initiative by IIT Bombay graduates. Creating awareness about generic drugs, extending maximum benefit to patients and making expensive drugs affordable to the general public is the sole objective of team Generico. Today, approximately 70% generic equivalents are available in the market and Generico plans to push this number to over 90% while ensuring effectiveness and quality of the generic equivalents. Local self help groups, NGOs, doctors, housing colonies etc will be roped in to create awareness about the generic drugs.


MLA Shree Ashok patil Purchased Generic Medicine after the Inauguration ceremony  आमदार श्री अशोक पाटील यांनी उद्घाटना नंतर काही औषधां खरेदी केली त्यावेळी औषध देतांना गिरीश अगरवाल, शिधार्थ गादिया व त्यांचे सहकारी 


जेनेरीको. भांडूप मध्ये प्रचलित औषधांचा स्वस्त जेनेरिक पर्यायांची विक्री करणाऱ्या औषधालयाचे उद्घाटन.

महागड्या औषधांच्या प्रचंड खर्चावर तोडगा; आय.आय.टी. मधील तरुण उद्योजकाद्वारे औषधांचा स्वस्त पर्यायांबाबत लोकांना जागृत करण्यासाठी भांडूप स्तुत्य उपक्रम हाती घेण्याचा निर्धार.


२५ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता, भांडूप पश्चिमेकडील, टेंक रोड, म.न.पा. शाळा समोर, जेनेरीको ह्या सर्वसामान्य जनतेस परवडणाऱ्या औषधलयाचे उद्घाटन आमदार श्री अशोक पाटील याच्या हस्ते करण्यात आले. गिरीश अगरवाल हे सदर औषधलयाचे संचालक असून त्यांनी ह्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांना त्यांनी जेनेरिक औषधांविषयी मार्गदर्शन केले. आमदार अशोक पाटील यांनी देखील ह्या प्रसंगी अगरवाल यांना सर्वसामान्य जनतेस परवडणाऱ्या औषधालय उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदन केले.

भारतातील सामान्यांसाठी आरोग्यसेवांची सद्य स्तिथी
जवळपास ४ कोटी भारतीय नागरिक इलाजास्तव महागडी औषधे विकत घेण्यासाठी घरदार विकतात व दारिद्र्याच्या काठावर येऊन ठेपतात. त्याहून क्लेशदायक म्हणजे त्यातील बहुतेक रुग्ण महागडी औषधे परवडत नसल्यामुळे मृत्युमुखी पडतात. अधिक महाग आरोग्यसेवा व त्यात ह्या मोठ्या कंपन्यांनी १०० ते १००० टक्क्यांनी महाग असलेली औषधे विक्रीस काढल्यामुळे भारतातील सार्वजनिक तसेच खाजगी आरोग्यसेवा व सुविधा सामन्य जनतेच्या आवाक्या बाहेर गेल्याचे दिसते.

प्रचलित व महागड्या औषधांवर जेनेरिक हा उत्तम पर्याय
त्याचवेळी स्थानीय निर्माते त्याच प्रचलित औषधाचे मूळ स्वरूपाचे निर्माण करून वेगळ्या ब्रँड खाली त्याचे वितरण करतात ज्यास ‘जेनेरिक’ औषधे असे म्हटले जाते.  जेनेरिक औषधांचा प्रसार करण्यासाठी, डॉक्टर, मार्केटिंग, बक्षिसी, सँपल, आदी विविध प्रमोशनचे ओझे (१००% ते १०००%) नसल्यामुळे मोठ्या कंपन्या व ब्रँडच्या त्याच औषधांपेक्षा जेनेरीक औषधे कैक पटीने स्वस्त असतात.

जेनेरिक औषधांसाठी सरकार देखील प्रयत्नशील
भारत सरकारद्वारे जेनेरिक औषधांच्या प्रसारार्थ ‘जन औषधी स्टोर्स’ चे जाळे उभारण्याचे काम देशभरात करण्यात येत आहे. प्रस्थापित औषधांपेक्षा सुमारे ८०% कमी दराने उपलब्ध केली जातात. एवढे कमी दर असून देखील ह्या जेनेरिक औषधांच्या निर्मात्यांना सुमारे २० ते २५ टक्के आर्थिक लाभ मिळतो हे नवल. डायबीटिस, हायपरटेन्शन आदी जीवनशैलीशी निगडीत आजारांवर तसेच इतर सामान्य व्याधींवर इलाजास्तव जेनेरीक औषधांचा वापर केल्यास वार्षिक तत्वावर किमान रु. २०००० ते रु. २५००० पर्यंतची बचत संभवते.

जेनेरिक औषधांसाठी ‘जेनेरीको’ चळवळ
‘जेनेरीको’ हा आय.आय.टी. मधील तरुण पदवीधरांनी सुरु केलेला एक सामाजिक उपक्रम आहे. सर्वसामान्य जनतेस जेनेरिक औषधांबाबत जागरूकता निर्माण करणे, रुग्णांना त्या औषधांचा लाभ मिळवून देणे, तसेच महागड्या आरोग्यसेवांना सामान्य जनतेच्या आवाक्यात आणून देणे हे जेनेरीको चे प्रमुख उद्देश्य आहे.  सध्या प्रस्थापित औषधांचे ७०% जेनेरिक समकक्ष उपलब्ध आहेत मात्र जेनेरीकोचा हि टक्केवारी ९०% पर्यंत नेण्याचा मानस आहे. जेनेरीको स्टोर्सच्या माध्यमातून स्वस्त व गुणवत्तेची शाश्वती असलेल्या औषधालयांची साखळी उभारण्यात येणार आहे ज्यामध्ये केवळ प्रस्थापित मानकांची पूर्तता करणाऱ्या औषधांचीच विक्री करण्यात येईल. स्थानीय नागरिक, समाजसेवी संगठना, डॉक्टर, रहिवाशी वसाहती इत्यादींच्या सहभागाने जेनेरीको व जेनेरिक औषधांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयास करण्यात येईल.














Popular Posts