Monday, November 10, 2014

Mumbai North East Suburban journalist Protest against javkheda murder mistry


जवखेडा तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ  पत्रकार आणि वार्ताहरांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण.

मुलुंड : मानवतेला काळिमा फासणा-या आणि उभ्या पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारे हत्याकांड म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील  जवखेडा येथील तिहेरी हत्याकांड आहे. या निर्घृण हत्याकांडाचा उपनगरातील सर्व पत्रकार-वार्ताहर यांनी एकत्र येवून आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.   तहसिलदार, कुर्ला यांच्याद्वारे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.  आणि या प्रकरणात जलदगतीने कारवाई करून आरोपींना अटक करण्यात यावी अशी एकमुखी मागणी या पत्रकारांनी केली. त्याचबरोबर तपास योग्य पद्धतीने अथवा दबावा मुळे होत नसेल तर तो तातडीने सीबीआय कडे देण्यात यावा. अशी विंनती पत्रकारांनी केली आहे.  
महाराष्ट्रात विविध कायदे असूनही धाक उरलेला नाही. जातपात,उच्चनिच्च या भेदभावावर आधारित सामान्य नागरिकांचे दमन करण्याचे प्रकार चालू आहेत. समाजात सौदार्हपूर्ण वातावरण निर्माण व्हावे याकरिता सामाजिक समरसता जोपासली जावी यासाठी विशेष उपक्रम राबवले जावेत.  राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणी विशेष प्रयत्न करावेत.अशी भावना या पत्रकारांनी व्यक्त केली.    
पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा अधिकाधिक उज्ज्वल होईल आणि आणि समाजातील सर्व घटकांना न्याय आणि सुरक्षेची हमी मिळेल अशा त-हेची पावले नव्या दमाने लवकर उचलावीत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.   जाधव कुटुंबियांना आपण लवकरात लवकर न्याय द्वावा अशी मागणी आम्ही सर्व पत्रकार, वार्ताहर आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी केली. 
प्रफुल कांबळे, नितीन मणियार, विनायक सुतार, आनंद पारगावकर, सुप्रिया मोरे, दिपाली साळवी, एस एम कबीर, मिहीर जोशी आणि त्याचबरोबर इतर सर्व पत्रकार वार्ताहर आणि सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते यांनी उपोषणात सहभाग घेतला.         

प्रफुल्ल कांबळे               नितीन मणियार    विनायक सुतार         आनंद पारगावकर
        युवा प्रभाव          पीएनआर न्यूज          लोकमार्ग                स्वतंत्र माहितीचा अधिकार    
(976800249)    (9768006860)  (9869856555)        (9769103056)

  सुप्रिया मोरे                  एस एम कबीर      दीपाली साळवी
                             पत्रकार                  प्रेस फोटोग्राफर      पत्रकार

(9773563273)  (9867866021)  (9892368696)

Mysterious Sucide of Vaibhav shetty

Mysterious Sucide of Vaibhav shetty body found hanging in a lodge at Andheri, he  was the Owner of six hotels in mumbai along with Vai...