Tuesday, June 26, 2018

भिंत कोसळल्याने जलवाहिनी बाधित

मुलुंड/वार्ताहर

मुलुंड पश्चिम येथील राहूल नगर परिसरात पाडलेल्या घराची भिंत कोसळली. तिचा डबर पिण्याच्या पाईप लाईनवर पडल्याने सुमारे अडिचशे कुटुंबियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

शनिवारी रात्री रिपरिप पडणाऱ्या पावसामुळे रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी अग्निशमन दलास ताबडतोब पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने येथे धोकादायक असलेला भाग काढून टाकला. मात्र कोसळलेल्या डबरीमुळे पाण्याची वाहिनी बांधित झाली. फुटलेली जलवाहिनी दुरूस्त करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. सतत रहिवाशांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर सोमवारी संध्याकाळी येथील परिसराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला.


1BHK for Sale at Mulund West, Mumbai

મુલુન્ડ (વેસ્ટ) વેચાણથી   ફૂલી ફર્નિશ રેડી પઝેશન  1 BHK, હાયર ફ્લોર, લિફ્ટ છે, એટેચ બાથરૂમ, ૪૬૦ ચોરસફૂટ કાર્પેટ,  અંબાજીધામ મંદિર પાસે,  સ્ટ...